जळगाव : तुझ्या पत्नीला माहेरी का पाठवून दिले? तुझी पत्नी गावात राहिली म्हणजे माझी देखील सोय होते. तु पत्नीला परत घरी बोलावून घे. जिभाऊचे हे वाक्य ऐकले म्हणजे दादाभाऊच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. परंतू मोठया प्रयत्नाने दादाभाऊ आपल्या रागावर नियंत्रण आणत होता. आपल्या पत्नीबद्दल अपशब्द बोलणा-या जिभाऊ ला आता काय करावे आणि काय नाही असा संताप दादाभाऊला होत असे.
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद या गावी शेतमजुर दादाभाऊ पांडुरंग देवरे आपल्या पत्नीसह रहात होता. दादाभाऊची पत्नी दिसायला देखणी होती. तिचे सौंदर्य एखाद्या अप्सरेसमान असल्यामुळे साहजीकच तिच्याकडे गावातील अनेकांचे लक्ष तिच्याकडे जात असे. गावातील अनेक जण तिच्या रुपाकडे निरखून बघण्याचे काम करत होते. त्यात गावातील वाल्मिक उर्फ जिभाऊ ओंकार जाधव हा आघाडीवर होता. दादाभाऊ हा शेतात तर जिभाऊ हा उसाच्या ट्रकवर चालक म्हणून कामाला जात असे. दादाभाऊ शेतात कामाला गेला म्हणजे इकडे जिभाऊ त्याच्या पत्नीवर डोरे टाकत असे. त्याच्या नजरेच्या खेळात दादाभाऊची पत्नी घायाळ होत असे. जिभाऊचा मदनबाण थेट दादाभाऊच्या पत्नीच्या काळजाला स्पर्श करुन जात होता.
दादाभाऊची पत्नी चंचल स्वभावाची होती. तिची भिरभिरती नजर गावातील जिभाऊच्या नजरेला नजर देत प्रतिसाद देत होती. ट्रकवरील चालकाचे काम आटोपून जिभाऊ घरी आला म्हणजे त्याला एकच उद्योग रहात होता. तो म्हणजे दादाभाऊच्या पत्नीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे. दादाभाऊच्या पत्नीला वश करणे जिभाऊला फार कठीण गेले नाही. दोघांची आखमिचौली लवकरच फळाला आली. बघता बघता दोघे एकमेकांना उच्च प्रतीचा एचडी स्वरुपाचा प्रतिसाद देवू लागले. हळूहळू दोघे एकमेकांना चोरुनलपून भेटू देखील लागले.
वास्तविक दादाभाऊची पत्नी एक विवाहिता होती. ती दादाभाऊची अर्धांगिनी होती. पती दादाभाऊच्या गैरहजेरीत तिचे अविवाहीत जिभाऊ सोबत संबंध ठेवणे तिला शोभत नव्हते. परंतु तिचे असे वागणे जिभाऊला फायदेशीर ठरत होते. जिभाऊ आणि दादाभाऊच्या पत्नीचे प्रेमसंबंध फार दिवस लपून राहिले नाही. दोघांच्या प्रेमाच्या वार्ता दहिवद या गावात प्रसारीत होवू लागल्या. कुणी दबक्या आवाजात तर कुणी खुलेआम दोघांच्या प्रेमाच्या चर्चा करु लागले. दहिवद गावाच्या पारावर बसणा-या तरुण व वयोवृद्ध शेतमजुरांच्या जिभेला दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा करण्याचे काम लागून गेले होते.
अशा प्रकारे दादाभाऊची पत्नी व जिभाऊ यांचा रोमान्स ऐन रंगात आला होता. या प्रकाराचा दर्प दादाभाऊला लागण्यास वेळ लागला नाही. आपल्या पत्नीचे गावातील जिभाऊसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा समजल्याने त्याचे पित्त खवळले. मात्र आपल्या संसाराचे हित लक्षात घेवून त्याने सुरुवातीला पत्नीला समजावून सांगितले. मात्र त्याच्या समजावण्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे दोघा पती पत्नीत घरात वाद होवू लागले.
अखेर त्याने पत्नीला तिच्या माहेरी पोहरे या गावी पाठवून दिले. दादाभाऊची पत्नी माहेरी निघून गेल्याची खबर जिभाऊला समजली. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. सुरुवातीचे काही दिवस त्याने कसेबसे काढले. दादाभाऊच्या गैरहजेरीत त्याच्या पत्नीचे गावातील जिभाऊ सोबत प्रेमसंबंध कायम रहात होते.
दादाभाऊ याने त्याच्या पत्नीला माहेरी पाठवून दिल्याने जिभाऊची मोठी अडचण निर्माण झाली. अखेर न राहवून त्याने सरळ दादाभाऊशी संपर्क साधला. त्याने थेट दादाभाऊला विचारणा केली अर्थात टोमणा मारला. “तु तुझ्या पत्नीला माहेरी का पाठवून दिले ? तुझी सोय होत होती, त्यापाठोपाठ माझी देखील सोय होत होती. आपली दोघांची तुझ्या पत्नीमुळे सोय होत असे. तु तुझ्या पत्नीला परत बोलावून घे. त्यामुळे तुझी व माझी सोय होईल असे जिभाऊने दादाभाऊला टोमणा मारला. त्याच्या अशा डिवचण्यामुळे दादाभाऊच्या मनाला वेदना झाल्या. त्याने कसाबसा आपल्या मनावर संयम ठेवत रागाला आवर घातला. दादाभाऊने त्याच्या पत्नीला सक्तीने माहेरी पाठवून दिल्यामुळे जिभाऊ चांगलाच अस्वस्थ झाला होता. त्याला चैन पडत नव्हती. त्यामुळे त्याचा संयम सुटला होता. तो दादाभाऊला नेहमीच टोमणे मारु लागला. तु तुझ्या पत्नीला माहेरी का पाठवून दिले. ती राहिली म्हणजे तुझी सोय होते आणि माझी देखील सोय होते असे टोमणे तो दादाभाऊला मारु लागला. जिभाऊच्या अशा टोमण्यामुळे दादाभाऊच्या मनात जिभाऊबद्दल राग साचत गेला.एके दिवशी त्याच्या मनातील राग ज्वालामुखीप्रमाणे उफाळून बाहेर आला.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे जिभाऊ उस वाहतुकीच्या गाडीवरुन घरी परत आला. जेवण आटोपून बनियन, पॅंट परिधान केलेल्या अवस्थेत तो घराबाहेर गेला. बाहेर सायकल दुरुस्तीच्या व मोबाईलच्या दुकानाजवळ शेकोटी पेटलेली होती. त्या शेकोटीजवळ जावून थंडीपासून बचाव करण्यासाठी तो अंग शेकू लागला. त्याच्या दुर्दैवाने त्याठिकाणी मोटारसायकलवर दादाभाऊ आला. जिभाऊ दृष्टीस पडताच दादभाऊच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याचे सततचे टोमणे ऐकून दादाभाऊचे मन घायाळ झाले होते.
जवळच सायकल दुकानातील पायडल दुरुस्त करण्याचा पाईप पडलेला होता. संतापाच्या भरात दादाभाऊने तो लोखंडी पाईप उचलला. जिभाऊजवळ जावून त्याने अहिराणी भाषेत आपला राग त्याच्यावर व्यक्त केला. “तुन गच्ची व्हई गय” असे म्हणत हातातील लोखंडी पाईप त्याने थेट जिभाऊच्या डोक्यात हाणला. काही कळण्याच्या आत डोक्याला हात लावून जिभाऊ खाली कोसळला. खाली पडताच त्याने जागेवर उलटी केली. काही वेळापुर्वी केलेले जेवण उलटीद्वारे बाहेर आले. या प्रकाराने घटनास्थळी एकच हल्लकल्लोळ माजला.
संतापाच्या भरात दादाभाऊ दुसरा वार करणार तेवढयात जवळ असलेल्या मनोहरने त्याचा हात पकडून त्याला हल्ल्यापासून रोखले. दादाभाऊच्या हातातील लोखंडी पाईप मनोहर याने हिसकावून घेतला. त्यावेळी समाधान वाघ व शिवाजी देवरे हे दोघे तेथे आले. त्यांनी त्याला “तु हे काय केलेस?” असा प्रश्न केला. त्यावर काहीही न बोलता दादाभाऊ तेथून त्याच्या ताब्यातील मोटार सायकलने कुंझर गावाच्या दिशेने निघून गेला.
या घटनेची माहिती मिळताच जिभाऊचे नातेवाईक धावतच घटनास्थळी आले. जिभाऊ याने घटनास्थळावर उलटी केली होती व बेशुद्ध झाला होता. त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपाचा जोरात फटका बसला होता. वाल्मिक उर्फ जिभाऊ याची अवस्था बघून त्याचा भाऊ अनिल जाधव व त्याच्या मित्रांनी त्याला उचलले. त्याला खासगी वाहनाने चाळीसगाव येथील डॉ. देवरे यांच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्याची तपासणी करुन डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह ग्रामिण रुग्णालय चाळीसगाव येथे नेण्यात आला.
सदर घटना कळताच अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी कैलास गावडे, सहायक पोलिस निरिक्षक सचिन बेंद्रे यांनी आपाल्या सहका-यांसह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी मयत जिभाऊचा भाऊ अनिल ओंकार जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला संशयीत आरोपी दादाभाऊ पांडुरंग देवरे (धनगर) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हा मेहुणबारे पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.20/20 भा.द.वि.302 नुसार दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेनंतर ताबडतोब सूत्रे हलवत दादाभाऊ पांडुरंग देवरे याला अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे व त्यांचे सहकारी गोरख चकोर करत आहेत.
Home Uncategorized दादाभाऊच्या पत्नीची फिगर, त्यावर जिभाऊची नजर ; लोखंडी पाईपाच्या दणक्यात झाला कायमचा...