जळगाव : जळगाव शहरात नुकतीच अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्क (फी) मागत आहेत.या संदर्भात असंख्य तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. विभागाने सर्व मंडळांच्या इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांसाठी सूचना जारी केल्या आहेत.यात अनलॉकच्या काळात कोणत्याही शाळेने विद्यार्थी/पालकांवर फी भरण्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट केले आले.
जळगाव जिल्हयातील कुठल्याही शासकीय, निमशासकीय शाळेने शैक्षणिक वर्षाच्या फी बाबत सक्ती केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शाळांना आंदोलनाचा झटका दाखविणार आहे. मनविसेचे संदीप महाले, महानगराध्यक्ष योगेश पाटील, महानगर उपाध्यक्ष पंकज चौधरी, अमोल वाणी, तुषार पाठक, जयेश बाविस्कर,राहूल पाटील,चेतन पाटील, रोहित चौधरी आदींनी याबाबत आवाहन केले आहे. कोणत्याही शाळेने फी भरण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतल्यास ७७७००५८८१६, ९९२२३१९९६६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मनविसेचे संदीप महाले यांनी केले आहे.