ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईन दिला नाही विद्यार्थ्याने केली आत्महत्या

सांगली : ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल आवश्यक झाला आहे. मोबाईल घेवून दिला नाही म्हणून एका शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सांगली जिल्हयाच्या जत तालुक्यातील मल्लाळ येथे घडली. आदर्श आप्पासाहेब हराळे (१५) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत जत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

आदर्श  हराळे हा विद्यार्थी त्याच्या आजीकडे रेवनाळ ( ता.जत) येथे शिक्षण घेत होता. नववी पास झाल्यानंतर तो दहावीत गेला. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे तो मुळगावी मल्लाळ हराळे वस्ती येथे आई- वडीलांकडे आला होता. दहावीचा ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी त्याला मोबाईल आवश्यक होता.

त्याने मोबाईलसाठी आई वडिलांकडे सारखा तगादा सुरु केला होता. त्याचे वडील शेतमजूर असल्याने त्यांची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांनी त्याला काही दिवस थांब पैसे आल्यावर आपण मोबाईल घेवू असे सांगितले. मात्र त्याने मोबाईलसाठी हट्टच धरला होता.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद असून मला ऑनलाईन अभ्यास करायचा आहे असे त्याचे म्हणणे होते. त्याला वेळेवर मोबाईल मिळाला नाही म्हणून तो नाराज झाला होता. त्याने घराच्या लोखंडी अँगलला दोरीच्या मदतीने गळपास घेत आपली जिवनयात्रा संपवली. या प्रकरणी दाखल अकस्मात मृत्यूचा तपास हवालदार प्रविण पाटील व बी. डी. भोर करीत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here