विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी शिक्षक निलंबित

On: August 10, 2021 2:44 PM

यवतमाळ : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाने निलंबीत होण्याची वेळ आली आहे. निलंबन काळात संबंधित शिक्षकास वणी पंचायत समिती मुख्यालयी राहण्यास सांगण्यात आले आहे. अरुण हरिदास राठोड (51) रा. जवळा, ता. आर्णी असे आरोप करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

तालुक्यातील बेलोरा जि.प. शाळेतील शिक्षक अरुण राठोड याने शिक्षण देण्याच्या नावाखाली सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सलग दोन महिने लैंगिक छळ केला. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर ग्रामस्थांनी राठोड यास पब्लिक मार दिला होता. यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनला त्याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. सदर शिक्षक गंभीर असल्यामुळे सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment