जळगाव : सध्या कोवीड-19 चा कहर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे सर्व जनजिवन ठप्प झाले आहे. समाजातील सर्व घटकांना त्याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसत आहे. या संकटातून जनतेच्या बचावासाठी महाराष्ट्र सरकार योग्य ती उपाययोजना करत आहे.
मात्र या कालावधीत शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ना. दादा भुसे युरीया न देणा-या व्यापारी वर्गावर योग्य ती कारवाई करत आहेत. असे असले तरी महाबिज कडून शेतक-यांना जे वाण पेरण्यासाठी दिले जात आहे ते सदोष आहे. या सदोष वाणामुळे शेतात उतारा होत नाही व पिक आले तरी ते जगत नाही. ते पिवळे होवून जळून जात आहे.
शासनाने दोषींवर कारवाई करावी अशी मागणी अॅड. कुणाल पवार (सचिव जळगाव शहर रा.कॉ. पार्टी) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना. अजित पवार तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदनाद्वारे केली आहे. नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेतात जावून पंचनामे करण्याची त्यांनी मागणी केली आहे. शेतक-यांना ठोस पॅकेज मिळण्याची देखील मागणी अॅड.कुणाल पवार यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.