शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा फेटाळला जामीन

On: August 11, 2021 1:44 PM

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्न फिल्म निर्मिती प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने पुन्हा वाढवली असून पुढील सुनावणी 20 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून 19 प्रकारची कारणे देत त्याच्या जामिनाला विरोध करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने सदर सुनावणी पुढे ढकलली आहे.

राज कुंद्रा तपासात सहकार्य करत नसल्याचे गुन्हे शाखेनं न्यायालयाला सांगितले आहे. या प्रकरणी अजून अनेक साक्षीदार आणि पिडीत साक्ष देण्याकामी पुढे येत असल्याचे गुन्हे शाखेने म्हटले आहे. पुरावे जमा करण्याचे काम देखील अद्याप सुरु असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

राज कुंद्रा प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे तो पुराव्यांसोबत छेडछाड करु शकतो तसेच साक्षीदारांवर प्रभाव देखील टाकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तो ब्रिटीश नागरिक असल्यामुळे देश सोडून पलायन देखील करण्याची शक्यता असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. राज कुंद्रा याच्या अटकेपुर्वी अनेक पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. त्याला जामीन मिळाल्यास अजून पुरावे नष्ट होवू शकतात असे तपासाधिकारी किरण बिडवे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment