जंतर – मंतरच्या घटनेचा पाचोरा येथे निषेध

पाचोरा (प्रतिनिधी) : दिल्ली येथील जंतर-मंतरला धार्मिक विद्वेष भडकवणा-या मुस्लिम समुदायाच्या संहाराचे आवाहन करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पाचोरा पोलीसात निवेदन देण्यात आले.

दिल्ली येथील जंतर मंतरवर भाजपाच्या उपाध्यक्षांसह इतरांनी एकाच धर्माविरुद्ध घोषणा देत जणूकाही दुसर्‍या फाळणीला जन्म देत असल्याचे वातावरण निर्माण करत आहेत. एका विशिष्ट समाजाला लक्ष करत देशात धार्मिक विद्वेष निर्माण करुन त्या समाजाच्या नरसंहाराचे आवाहन करणारे हे समाज कंटक देशात अराजकता माजवू पहात आहे. ही घटना धर्मनिरपेक्ष भारतीय लोकशाहीला जागतिक पातळीवर काळीमा फासणारी आहे. भारतीय संविधान आणि भारतीय दंड संहिता विधान मोडीत काढणारी आहे. या विरोधात पाचोरा पोलीसात भा.द.वि. 153 अ कलमा खाली गुन्हा दाखल होण्यासाठी आज एका शिष्टमंडळाने पोलीस स्टेशनला भेट देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड. अभय पाटील, पत्रकार प्रविण ब्राह्मणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते खलिल देशमुख, शहर अध्यक्ष अझर खान, माजी नगराध्यक्ष नसीर बागवान, नगरसेवक अशोक मोरे, भिमराव खैरे, अझर मोतीवाला, मुस्लिम बागवान, अ‍ॅड. मंगेश गायकवाड, अ‍ॅड. अब्दुल वहाब, मतीन बागवान, जहीर खाटीक, साजीद खान, आफताफ खाटीक, अकील शेख, नंदलाल आगारे, रीयाज बागवान, हमीद शाह आदींनी उपविभागीय पोलिस अधिकारी काकडे, सहा. पोलीस निरीक्षक मोरे यांना निवेदन देत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here