कंपनी व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

औरंगाबाद-वाळूज : लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी कंपनी व्यवस्थापकाला गुंडांकरवी जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघे अटकेत आहेत. या घटनेची दखल घेत उद्योगांना सरकारचे पूर्ण संरक्षण दिले जाणार असून गुंडांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील भोगले ऑटोमोबाइल कंपनीतील एका कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निमित्त पुढे करत गुंडांच्या टोळक्याने कंपनीत धुडगुस घालत अधिका-यास मारहाण केली होती. सीएमआयए, मसिआ या उद्योजकांच्या संघटनेने पोलिसांकडे संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे. नाहक त्रास देणाऱ्या गुंडांची यादी देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर काही तासातच गणेश कोटिंग कंपनीचे व्यवस्थापक शिरीष राजेभोसले यांना किरण कीर्तीकर यांच्यासह काही जणांनी रस्त्यात गाठत बेदम मारहाण केली. लेबर कॉन्ट्रॅक्ट दिले नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे राजेभोसले यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here