पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना युनियन होम मिनिस्टर पदक

किचकट गुन्ह्याचा खुबीने तपास करत छडा लावणार्‍या देशभरातील 152 पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने युनियन होम मिनिस्टर पदक जाहीर केले. महाराष्ट्र पोलीस दलात असलेल्या अकरा पोलीस अधिकार्‍यांचा यात समावेश असून त्यात चार महिला पोलीस अधिका-यांची नावे आहेत. सुनिल कडासने यांनी श्रीरामपूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर नियुक्तीला असताना दुहेरी खूनाच्या तपासकमासाठी झोकून दिल्याबद्दल हे पदक जाहीर झाले आहे.

पोलिसांमध्ये तपास कामाबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून सन 2018 मधे केंद्र सरकारने या पुरस्कारांची सुरुवात केली आहे. सदर पारितोषिके पटकावणा-या कर्मचार्‍यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील पधरा जण आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील 11, गोवा पोलीस दलातील एक तसेच गुजरात पोलीस दलातील 6 अधिकार्‍यांना हे पदक जाहीर झाले आहे.

मध्यप्रदेश 11, उत्तरप्रदेश 10, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी 9, तामिळनाडू 8 आणि बिहाराचे 7, कर्नाटक आणि दिल्ली पोलीस दलातील प्रत्येकी सहा व इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकारी वर्गाचा यात समावेश असून त्यात 28 महिला पोलीस अधिकारी आहेत.

महाराष्ट्रातील पदकप्राप्त अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस निरीक्षक ममता लॉरेन्स डिसोझा, सहायक पोलीस आयुक्त पद्मजा अमोल बधे, सहायक पोलीस निरीक्षक अलका धीरज जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रिती प्रकाश टिपरे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल धलसिंग बहूरे, पोलीस निरीक्षक मनोहर नरसप्पा पाटील, उपअधीक्षक अजित राजाराम टिके, पोलीस निरीक्षक सुनील शंकर शिंदे, उपअधीक्षक उमेश शंकर माने-पाटील इत्यादी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here