सोन्याचे दर गेल्या चार महिन्याच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. मल्टी कमॉडीटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळापेक्षा कमी झाले आहेत. सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी स्तरावर आहेत.
एमसीएक्सवर गेल्या तीन सत्रात सोन्याचे भाव सुमारे 1.3 टक्क्यांनी कमी झाले असून चांदीचे दर देखील 1.5 टक्क्यांनी घटले आहेत. आज बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. एमसीएक्स वर आज सकाळी सोन्याच्या दरात 0.13 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे.
मंगळवारी दिल्ली येथील सराफा बाजारात सोन्याचे भाव 176 रुपयांनी कमी झाले. त्यानंतर ते 45,110 रुपये प्रति तोळा गेले. चांदीचे दर 898 रुपये प्रति किलोने कमी झाले व 61,715 रुपये प्रति किलोवर जावून पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1,735 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 23.56 डॉलर प्रति औंस होते. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे भाव जवळपास 56200 रुपये प्रति तोळा एवढे गेले होते. सध्या सोन्याचे दर बाजारात 45,000 रुपये प्रति तोळाच्या जवळपास आहेत. सोन्याची गुंतवणूकीसाठी हा चांगला काळ मानला जात आहे.