अमरावतीत दोन वेगवेगळ्या घटनांमधे तरुण व नवविवाहितेची हत्या

On: August 13, 2021 10:38 AM

अमरावती : अमरावती शहरात सलग दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. एका घटनेत सतरा वर्षाच्या तरुणाचा जुन्या वादातून गळा चिरुन खून करण्यात आला आहे. दुस-या घटनेत नवविवाहितेची तिच्या पतीने गळा आवळून हत्या केली आहे.

अनिकेत ज्ञानदीप कोकने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या हत्येप्रकरणी प्रशिक बारसे आणि विशाल गडलिंग यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. प्रशिक बोरसे हा होमगार्ड आहे. गुरुवारच्या दिवशी अनिकेत कोकने हा तरुण एटीएम वर गेला असता त्याठिकाणी आलेल्या प्रशिक व विशाल या दोघांनी त्याचा पाठलाग करत त्याला फ्रेजरपुरा परिसरात गाठले. त्याठिकाणी त्याची दोघांकडून हत्या करण्यात आली.

दुस-या घटनेत आदर्शनगर भागात नवविवाहिता पुजा (22) हिचा तिचा पती विजय राठोड याने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपुर्वी पुजाचा मोबाइल फुटल्यामुळे तिला नवा मोबाईल हवा होता. मोबाईल घेण्यासाठी तिने पती विजयकडे तगादा लावला होता. मोबाईलच्या वादातून विजयने पुजाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो थेट पोलिसात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment