पोलिस उप निरीक्षकाची गळफास घेत आत्महत्या

On: August 14, 2021 8:36 AM

अमरावती : प्रमोशनच्या मार्गावर असलेले अमरावती शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला नेमणूकीस असलेले पोलिस उप निरीक्षक अनिल मुळे (32) यांनी शुक्रवारी सायंकाळी झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले अनिल मुळे हे सन 2012 च्या बॅचचे पोलिस उप निरीक्षक आहेत. सन 2013 पासून पोलिस दलात हजर झाल्यापासून ते अमरावती आयुक्तालयात नेमणूकीला होते. काही महिन्यापासून ते फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला नेमणूकीला असले तरी मार्च 2021 पासून सुटीवर होते. रहाटगाव परिसरातील एका झाडाला त्यांचे शव लटकलेल्या अवस्थेत परिसरातील लोकांना आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली.

नांदगाव पेठ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सहायक पोलिस निरिक्षक पदी बढतीस ते पात्र होते. काही दिवसातच त्यांचे प्रमोशन होण्याच्या मार्गावर असतांना त्यांनी आत्महत्या का केली याच उलगडा होऊ शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment