एसटीत अडीच लाखाची रोकड चोरणा-या पाच महिला अटकेत

On: August 14, 2021 10:02 AM


अजिंठा : शिवना येथील जेडीसीसी बॅंकेत पाच लाखाची रोकड भरणा करण्यासाठी जात असलेल्या व्यवस्थापकाच्या ताब्यातील अडीच लाख रुपयांची चोरी करणा-या पाच महिला प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसटी वाहकाच्या सतर्कतेमुळे व ग्रामस्थांच्या सतर्कतेने व पोलिसांच्या वेळीच मिळालेल्या सहकार्याने अडीच लाख रुपयांची होणारी चोरी टळली आहे. पाचही चोरट्या महिलांना अजिंठा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील जेडीसीसी बॅंकेचे व्यवस्थापक पाच लाख रुपयांची रोकड जमा करण्यासाठी सिल्लोड येथून औरंगाबाद-सोयगाव एसटी बसने प्रवास करत होते. दरम्यान गोळेगाव येथे पाच महिला प्रवाशांनी बँक व्यवस्थापकाची नजर चुकवत अडीच लाख रुपये लंपास करण्याच्या तयारीत असतांना हा प्रकार वाहकाच्या लक्षात आला. गोळेगाव येथील ग्रामस्थांनी अजिंठा पोलिसांच्या मदतीने पाचही महिलांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment