नाशिक : स्वस्त भाड्यात हज यात्रेला जाण्यासाठी पॅकेजचे आमीष दाखवत प्रवाशांची 3 कोटी 78 लाख 77 हजार 400 रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रथम वर्ग न्यायधिश यांच्या आदेशाने सदर गुन्हा ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात दाखल करण्यात आला आहे.
मुज्जमिल्ल युसूफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेहान इंटरनॅशनल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीचे संचालक मतीन अजिज अहमद मणियार ऊर्फ कादरी (33) यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीन अजिज अहमद मणियार याने स्वस्त भाड्यात हज यात्रेचे पॅकेज करुन देण्याचे आमिष दाखवत सन 2014 ते डिसेंबर 2018 या कालावधीत अनेक हज यात्रेकरुंकडून रक्कम जमा केली होती.
रोख, चेक आणि ऑनलाईन स्वरुपात जमा केलेली सदर रक्कम जवळपास चार कोटी रुपयांच्या घरात त्याने जमा केली होती. मात्र कुणालाही त्याने हज यात्रेसाठी नेले नाही वा तिकिटे काढून दिली नाही.