जबरी चोरीतील फरार आरोपी अटक

On: August 16, 2021 8:28 PM

जळगाव : भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालय चौफुलीनजीक आज भल्या पहाटे तिघांना शिवीगाळ, मारहाण व जबरी चोरी करणा-या दोघांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

शेख इद्रीस शेख ईकबाल (रा.ग्रीन पार्क भुसावळ), मोहम्मद तसेच त्यांचा हमाल दिनेश असे तिघे जण सफरचंदचे बॉक्स सुरत येथे पाठवण्याकामी लक्झरी बसची वाट बघत नाहाटा चौफुलीजवळ असलेल्या एम.जे.ट्रॅव्हल्स पार्कींगजवळ उभे होते. त्यावेळी दोन अनोळखी इसम फोर व्हिलरने त्यांच्याजवळ आले. आलेल्या दोघांनी तिघांना तुम्ही रस्त्यावर का उभे आहात असे म्हणत मारहाण व शिवीगाळ करु लागले. दरम्यान आलेल्या दोघांनी बसची वाट बघणा-या दोघांकडून सफरचंदचे तिन बॉक्स, मोबाइल व तिन हजार रुपये हिसकावून घेत पोबारा केला.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 357/2021 भा.द.वि. 392, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो.नि.दिलीप भागवत व त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिषेक राजेश शर्मा (23) रा. चमेली नगर व रितीक नरेश चौधरी (22‌ रा.पंचशील नगर भुसावळ या दोघांना वांजोळा रोड येथून ताब्यात घेत अटक केली. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश गोटला, स.पो.नि.अनिल मोरे,पो.ना. विकास सातदिवे, रमण सुरळकर उमाकांत पाटील पो.कॉ. दिनेश कापडणे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, जिवन कापडे आदींनी तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment