अवैध बायो डिझेल विक्री पंपावर मालेगावात छापा

नाशिक : मालेगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत चिखल ओहोळ शिवारात मुंबई आग्रा महामार्गालगत हॉटेल रॉयलच्या आवारात बेकायदा बायो डिझल विक्रीचा प्रकार अव्याहतपणे सुरु होता. या पंपावर 4 ऑगस्ट रोजी मालेगाव तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकला होता. या छाप्याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखल ओहळ शिवारातील हॉटेल रॉयलच्या आवारात पत्राच्या शेडमधे अवैधरित्या एका लोखंडी टाकीत अंदाजे अकराशे लिटर मापाचा अंदाजे 82 हजार 500 रुपये किमतीचा बायो डीझल सदृश्य विस्फोटक द्रव्याचा पंप छाप्यादरम्यान आढळून आला होता. या कारवाईत शेख जलील शेख सफी (रा- न्यु म्हाडा प्लॉट, प्लॉट नं.१०२, अक्रम मशिद जवळ मालेगाव व शेख वसीम शेख यासीन (रा – नया आझादनगर, घर नंबर 593, मालेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैधरित्या जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3 चे उल्लंघन 7 तसेच स्फोटक अधिनियम (द्रव्य) अधिनियम 1884 चे कलम 9 – ब (9)(ब) सह कलम मुंबई वजन व मापे (अंमलबजावणी) अधिनियम 1958 चे कलम 25 प्रमाणे सह भा.द.वि. 285, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा संशयीत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 21 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. देवीदास ढुमणे यांच्यासह पोलिस उप निरीक्षक मोरे, सहायक फौजदार साळे, हवालदार बागुल, पोलिस नाईक मोगल, पोलिस नाईक आढाव, पो.कॉ. दळवी, पो.कॉ. जाधव, पो. कॉ. थोरात, पो.कॉ. कासार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here