नाशिक : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणा-या शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. स्वप्नील शिंदे असे संशयास्पद मृत्यू झालेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. गायनॅकॉलॉजीच्या दुसर्या वर्षाचे शिक्षण घेणा-या स्वप्निल शिंदे याचा रॅगिंग प्रकरणातून घातपाताचा आरोप त्याच्या परिवारातील सदस्यांनी केला असून या घटनेने खळबळ माजली आहे.
मृत्यु झालेल्या स्वप्निलच्या परिवारातील सदस्यांनी केलेल्या आरोपाचा महाविद्यालय प्रशासनाकडून इन्कार करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेची योग्य ती चौकशी केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. स्वप्नीलकडे मिळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये रॅगिंग करणार्यांची नावे नमुद असल्याचा दावा त्याच्या परिवाराने केला आहे.