जादूटोणा करणारे युपीचे दोघे भोंदू अटक

औरंगाबाद : आजच्या युगात प्रत्येकाला समस्या असतात. या समस्या निवारणाचे भांडवल करुन अनेक भोंदूबाबा आपली दुकानदारी चालवत असतात.  जादूटोणा करत भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडणा-या उत्तर प्रदेशातील दोघा भोंदू भामट्यांना क्रांती चौक पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने अटक केली आहे.

गौतमनगर भागात भाड्याच्या दुकानात हे दोघे भोंदू भामटे आपली दुकानदारी चालवत होते. मोहम्म नईम मलीक मोहम्मद यामीन (40) व शहजाद अन्सारी निरास अन्सारी (26) दोघे रा. ग्राम इंचोली मेरठ उ.प्र. अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत. अटकेतील दोघांपैकी मोहम्मद नईम याला सिटी चौक पोलिसांच्या पथकाने अटक केली होती. मात्र तरीदेखील त्याचे लोकांना फसवण्याचे उद्योग सुरुच राहिले.

डमी ग्राहक पाठवून शुक्रवारी दुपारच्या वेळी क्रांती चौक पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. डमी ग्राहकाकडून संकेत मिळताच पथकाने दोघांच्या फसवणूकीच्या उद्योगावर छापा टाकत त्यांना अटक केली. छाप्यचे वेळी पथकाला जादूटोण्याचे साहित्य मिळून आले. आरोपी शहजाद अन्सारी त्याठिकाणी बसून भक्तांच्या नावाची नोंद करत होता. दोघांविरुद्ध नरबळीसह इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच्या कब्जातून टेबल, धारधार चाकू, त्यावर लिंबू, अगरबत्ती, फुले, टाचण्या, दोरा बंडल, ताटातील चिल्लर पैसे, चाकू असे जादूटोणा करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here