ग्लोबल एक्सलन्स अ‍ॅवार्ड पुरस्काराने अनिल जैन यांचा सन्मान

जळगाव : पाण्याच्या क्षेत्रात जागतीक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “एनर्जी अ‍ॅण्ड एन्व्ह्यायर्मेंट फाऊंडेशन” या संस्थेच्या वतीने ग्लोबल एक्सलन्स अ‍ॅवार्ड हा पुरस्कार जैन इरीगेशनचे उपाध्य्क्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला आहे. उर्जा व पर्यावरण फाऊंडेशनचे व्हर्चुअल फोरम असून दोन दिवसीय पाचवी जलशिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

जैन इरिगेशनच्या पर्यावरण व पाणी व्यवस्थापन संदर्भात करण्यात आलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार अनिल जैन यांना देण्यात आला आहे. जल व्यवस्थापनातील नाविण्यपुर्ण तंत्रज्ञान, नवनवीन शोध आणि स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट्चा वापर करुन समाजाला विकासाच्या वाटेवर आणण्याची जबाबदारी घेणा-या संघटनांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार अनिल जैन यांना देण्यात आला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here