जळगाव : जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिंप्राळा येथील शाळा क्रमांक 46, निमदी शाळा व चेतनदास मेहता हॉस्पिटल सिंधी कॉलनी या ठिकाणी जनतेला लसीकरण करुन देणारे डॉक्टर्स, आशा वर्कर्स यांचा सन्मान करण्यात आला.
जनमत प्रतिष्ठान कडूच्या वतीने प्रगती शाळेचे शिक्षक भालेराव, माजी नगरसेवक महेश चौधरी, विजय ल्युल्हे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार केला. महेश लाठी, प्रतिभा मेटकर, कोटा क्लासेसचे संजय कुमार सिंग, पोलीस सेवा संघटनेच्या हर्षाली पाटील,राजेंद्र कुमार वर्मा, पराग जोशी, डॉ, लिना आदींची यावेळी उपस्थिती होती.