जळगाव : जळगाव शहर रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील हरिविठ्ठल नगर परिसरातून काळ्या रंगाची महागडी पिस्टल व पाच काडतुसे मिळून आली आहेत. रामानंद नगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. शहरासह जिल्ह्यात वारंवार पिस्टल आढळून येत असल्याने हा एक चिंतेचा विषय झला आहे. 55 हजार रुपये किमतीची महागडी पिस्टल व पाच काडतुसांचा ऐवज बाळगणा-या विनोद बापु शिंदे (रा.राजपुत कॉलनी, हरीविठ्ठल नगर, जळगाव) यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
पो.नि. किरण शिंदे यांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनचा चार्ज हाती घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रथमच आपल्या सहका-यांच्या मदतीने पिस्टल जप्त करण्यात यश मिळाले आहे. स.पो.नि. राजेश शिंदे यांच्यासह सुशिल चौधरी, पो.ना. प्रविण जगदाळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.