नाशिक – महिला तलाठ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्याच्या येवला येथील प्रांताधिकारी चंद्रकांत कासार यांच्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला तलाठ्याच्या तक्रारीवरुन येवला शहर पोलिसांनी चंद्रकांत कासार यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याविरुद्ध भा.द.वि.354 (अ), 504 नुसार येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने महसुल विभागात खळबळ माजली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी विविध संघटना व तक्रारदारांकडून मागणी करण्यात आली होती.