चालक, क्लीनरला मारहाण – धाग्याच्या गाठीसह पळवला ट्रक

काल्पनिक छायाचित्र

कन्नड – ट्रकवरील चालकासह क्लीनरला मारहाण करत त्यांच्या ताब्यातील धाग्याच्या गाठीचा ट्रक लुटून नेल्याची थरारक घटना 25 ऑगस्टच्या सकाळी दोन वाजता कन्नड-अंधानेर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बायपासवर घडली. सदर ट्रक (एमएच 18 बीए 539) बंगळुरु येथून धाग्याच्या गाठी घेऊन निघाला होता. प्रल्हाद वामन पाटील (31) रा. मेहरगाव कावठी जिल्हा धुळे असे चालकाचे तर गणेश पाटील (30) रा. एरंडोल ह.मु. सुरत असे जखमी क्लिनरचे नाव आहे.

अज्ञात मारेक-यांनी चालक व क्लीनरला गाडीच्या खाली उतरवून बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांचे हातपाय बांधून वाटेतच सोडून ट्रकसह पलायन केले. सकाळी शेतातील काही मजुरांचे त्यांच्याकडे लक्ष गेल्यावर त्यांनी त्यांची सुटका करत कन्नड पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनाक्रम जाणून घेतला. ट्रकचालक प्रल्हाद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार लाख रुपयांच्या धाग्याच्या गाठी, आठ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण बारा लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याप्रकरणी कन्नड शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here