पो.नि. विजय पाटकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

On: August 27, 2021 4:42 PM

अकोला – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पो.नि. विजय पाटकर यांच्याविरुद्ध अकोला सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतरा वर्षाच्या मुलीने सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनला याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीनुसार 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी पिडीत मुलगी तिच्या चुलत बहिणीसह शालेय साहित्य खरेदीसाठी गेली होती. परत येत असतांना रस्त्यात पो.नि. विजय पाटकर यांनी तिचा विनयभंग केला. भेदरलेल्या पिडीतेने घरी गेल्यावर पालकांच्या कानावर हा प्रकार कथन केला.

या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी पिडीतेसह तिचे आईवडील पो.नि. पाटकर यांच्या निवासस्थानी गेले असता त्यांना अपमानीत करण्यात आले. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनला पो.नि. विजय पाटकर यांच्यासह त्यांची पत्नी व मुलीविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment