घरफोडीतील भांड्यांचा खरेदीदार पोलिसांच्या ताब्यात

On: August 28, 2021 3:16 PM

जळगाव – भुसावळ शहरातील भांड्यांचे व्यापारी राजेंद्र शंकर मुळे यांच्या दुकानात काही दिवसांपुर्वी चोरी झाली होती. या चोरीत 47 हजार रुपयांची भांडी चोरीला गेली होती. या चोरीप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या तपासात आकाश उर्फ चॅम्पियन शाम इंगळे(21) रा.आठवडे बाजार भुसावळ व आशिफ शहा शरीफ शहा (32) रा.काझी प्लॉट भुसावळ यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सदर चोरीचा गुन्हा कबुल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्य कब्जातून चोरीची 16 हजार 120 रुपयांची भांडी हस्तगत करण्यात आली.

अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या दोघांकडून चोरीचा माल खरेदी करणारा शेख बिस्मिल्ला उर्फ बिसू शेख माली (40) रा.पंचशील नगर भुसावळ याला देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून चोरीचा उर्वरीत 30 हजार रुपये किमतीची भांडी हस्तगत करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश गोटला, हरीश भोये, पो.हे.कॉ. नेव्हील बाटली, रविंद्र बिऱ्हाडे, पो.ना. विकास सातदिवे, रमण सुरळकर, पो.कॉ. चेतन ढाकणे, प्रशांत परदेशी, दिनेश कापडणे,सचिन चौधरी, ईश्वर भालेराव आदींनी तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास हे.कॉ. कंक करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment