देवकर रुग्णालयातर्फे रुग्ण तपासणी शिबीर उत्साहात

जळगाव : श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयूष रुग्णालयाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसात विविध ठिकाणी शिबीराच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करण्यात आली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. या शिबीराच्या माध्यमातून सुमारे चार हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य तो सल्ला देण्यात आला. सर्व विकारांवरील तज्ज्ञ डॅक्टरांकडून या शिबीराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली.

देवकर रुग्णालयातर्फे 22 जुलैपासून तालुक्यातील जळगाव, चिंचोली, शिरसोली प्र. न., जळके, वावडदा, म्हसावद, सुभाषवाडी, पिप्राळा, जळगाव आणि चोपडा शहर आदी ठिकाणी रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात नेत्ररोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात होते. तसेच अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, दंतरोग, हृदयरोग, मधुमेह, किडनी-स्टोन व रक्तदाबाच्या रुग्णांची देखील योग्य ती तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. अभिजित पाटील, डॉ. वैभव गिरी, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. शैलेजा चव्हाण, डॉ. श्रीराज महाजन, डॉ. रेणुका चव्हाण, डॉ. स्वप्नील गिरी, डॉ. प्रियंका चौधरी, डॉ. तेजस पाटील, डॉ. अमित नेमाडे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. कुशल चौधरी, डॉ. हेमंत पाटील व डॉ. भूषण चव्हाण या विविध विकारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्ण तपासणीत सहभाग घेतला. शिबीराचे आयोजन व समन्वय साधण्याचे काम डॉ. नितीन पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here