अभियंत्याच्या पत्नीची गळफास – तिघांना पोलिस कोठडी

On: August 29, 2021 9:58 AM

जळगाव –  विविध कारणांनी होणा-या त्रासाला वैतागून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागात 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी विवाहीतेच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. दामिनी वैभव वैदकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वैभव वैदकर असे विद्युत निरीक्षक कार्यालयात कनिष्ठ अभियंता असलेल्या सदर विवाहितेच्या पतीचे नाव आहे.  

लग्नात हुंडा कमी दिला, मुलीच्या अंगावर डाग आहेत, कार घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी दडपण टाकणे अशा विविध कारणांनी आत्महत्या केलेल्या विवाहितेचा छळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या त्रासाला कंटाळून दामीनी वैदकर या विवाहीतेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी पती वैभव, सासरा रामचंद्र, सासू ज्योती व नणंद नयना वैदकर या चौघांविरोधात जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती, सासू, सासरा अशा तिघा जणांना संशयीत म्हणून अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment