चाळीसगाव पुरग्रस्तांच्या मदतीला जळगाव पोलिस

जळगाव – चाळीसगाव येथे तितुर नदीला महापुर आला असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. चाळीसगाव येथून औरंगाबादकडे जाणारा कन्नड घाट देखील पुरामुळे बंद झाला आहे. एकुणच चाळीसगाव येथील जनता पुरामुळे संकटात सापडली आहे.

अशा प्रसंगी जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्यासह जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी व रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिका-यांनी पुढाकार घेत दात्यांच्या माध्यमातून विविध वस्तू व खाद्य पदार्थांनी भरलेले वाहन चाळीसगावला रवाना केले.

या वाहनातून पिण्याच्या पाण्याच्या शंभर बाटल्या, बिस्कीटचे 4500 पुडे, ब्लॅंकेट 150 नग, चटई 500 नग, फुड पॅकेट्स 500 नग अशा वस्तूंचे मोठ्या पोलिस वाहनातून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या आवारात सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवानगी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here