नाशिक – गेल्या काही दिवसात पोलिस अधिका-यांच्या बदल्या झाल्या. बदल्या झाल्यानंतर काही पोलिस अधिका-यांच्या मिरवणूका देखील काढण्यात आल्या. या मिरवणूका काढतांना कोरोना नियमांचे काही ठिकाणी उल्लंघन झाले.
नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या काही प्रभारी अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांच्या मिरवणूका काढण्यात आल्या होत्या. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले गेले. या प्रकरणी चौकशीचे आदेश दोघा अप्पर पोलिस अधिक्षकांना देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल पोलिस अधिक्षकांना देण्यात आला आहे. या बाबत संबंधितांवर कारवाइचे संकेत देण्यात आले आहेत. मालेगावचे अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी आणि शर्मिष्ठा वालावलकर यांनी हा अहवाल दिला आहे.