नाशिक (सिडको) – अंबड येथील कारगिल चौकात 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गवळी असे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल याच्यावर तिघा तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करत त्याला जिवे ठार केले. त्यामुळे तो जागेवरच मृत्युमुखी पडला. अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा अशी चर्चा परिसरात सुरु आहे. पोलिस पथक मारेक-यांच्या मागावर असून तपास सुरु आहे.