नाशिक (सिडको) – अंबड परिसरातील कारगिल चौकात युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
राहुल गवळी असे मंगळवारी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेखा राजगिरे यांनी अंबड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2009 मधे सुरेखा रागगिरे यांचे पप्पू राजगिरे यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर काही वर्षांनी पप्पू रागगिरे यांचे अपघाती निधन झाले होते.
त्यानंतर मयत राहुल व सुरेखा राजगिरे यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले. सुरेखा राजगिरे या मयत राहुलसोबत रहात असल्याचा राग सुरेखा राजगिरे यांच्या दिरांच्या मनात होता. त्यामुळे राहुल यास त्यांच्याकडून जिवे ठार मारण्याची धमकी देखील मिळाली होती. अंबंड पोलिसांकडून संशयीतांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी संशयीतांनी राहुल यास तो रहात असलेल्या घरात जावून त्याची कोयत्याने हत्या केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.