जळगाव – सुमारे 30 इंच लांबीची धारदार तलवार बाळगणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातून ताब्यात घेत अटक केली आहे. मोहीत अशोककुमार मकडीया असे अटक करण्यात आलेल्या व तलवार बाळगणा-या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळसकर, सुधीर साळवे, सचिन पाटील, पो.कॉ. चंद्रकांत बळीराम पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईने परिसरात खळबळ माजली होती. सिंधी कॉलनी भागात गुन्हेगारी वाढली असल्याचे वेळोवेळी होत असलेल्या व उघडकीस येत असलेल्या घटनांवरुन लक्षात येते.
कधी काळी शांत समजला जाणारा सिंधी कॉलनी परिसर सध्या विविध स्वरुपाच्या गुन्हेगारी घटनांमुळे प्रकाशझोतात आला आहे. या परिसरात गुन्हेगारी अधूनमधून डोके वर काढत असते. या परिसरातील गुन्हेगारी ठेचून व पाळेमुळे खणून काढण्याचे काम एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिका-यांनी मनावर घ्यावे असे जनतेत म्हटले जात आहे.