औरंगाबाद (वाळूज) – महिला रुग्णाची छेडखानी करणा-या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. सदर डॉक्टरला कारवाईपुर्वी महिलेच्या नातेवाईकंनी बेदम चोप दिला होता. डॉ. नागेश शेजवळ (35) टोकी ता. गंगापूर असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून सुखायू क्लिनिक नावाचा दवाखाना जोगेश्वरीत चालवतो.
कानदुखीचा त्रास होत असल्यामुळे 2 स्प्टेबर रोजी सदर विवाहीत महिला आपल्या सासुसमवेत डॉ. नागेश शेजवळ याच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. सासु बाहेर गेल्याची संधी साधत डॉ. नागेश शेजवळ याने इंजेक्शन देण्याचा बहाणा करत महिलेचा हात धरल्याचा आरोप आहे.
महिलेने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी पसार झालेल्या व लपून बसलेल्या डॉ. शेजवळ यास बेदम चोप दिला. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक देखील करण्यात आली आहे.