जळगाव – जळगाव शहरातील भिलाटी मेहरुण भागात हातात धारदार लोखंडी सुरा घेऊन फिरणा-या व दहशत माजवणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यास यश मिळवले आहे. दिनेश शिवराम राठोड असे रामेश्वर कॉलनीत राहणा-या अटकेतील शस्त्रधारी तरुणाचे नाव आहे.
पो.नि.प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाडे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक इमरान सैय्यद, मिलींद सोनवणे, मुदस्सर काझी, पो.कॉ. सच्निन पाटील, गोविंदा पाटील व साईनाथ मुंढे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील तरुणाविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.