धुळे – धुळे तालुक्यातील चौगाव येथील विवाहितेला सक्तीने विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुका पोलिस स्टेशनला विवाहितेच्या तक्रारीनुसार सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कौटुंबिक वादातून विवाहीता सोनल नथ्थु मासुळे (23) ही विवाहीता गेल्या काही वर्षांपासून माहेरी होती. सोनल मासुळे हिच्या गेल्या तिन महिन्यापासून सासरी येण्याला पती नथ्थु राघो मासुळे याचा विरोध होता. यामुळे नणंद सुशीला सरदार सूर्यवंशी, साखरबाई राघो मासुळे व पती नथ्थू मासुळे यांनी वाद घालत तिला विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची तक्रार धुळे तालुका पोलिस स्टेशनला देण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.