नाशिक – पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून विवाहितेच्या पतीसह त्याच्या दोघा मित्रांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल निखाडे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रमोद महाजन गार्डननजीक असलेल्या एका अपार्टमेंट मधे हल्ल्याचा हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात राहुल निखाडे हा तरुण गंभीर जखमी झाला. विवाहितेच्या पतीसह त्याच्या दोघा साथीदारांनी राहुल निखाडे याच्या डोक्यावर, हातावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.