दोघे दरोडेखोर नगर एलसीबीच्या ताब्यात

नगर : दरोड्याच्या घटनेत सोने चांदी व रोख रक्कम असा एकुण 12 लाख 20 हजार रुपये मुल्याचा ऐवज लंपास करणा-या दोघा दरोडेखोरांना नगर एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.

शिर्डीच्या सितानगर भागातील रहिवासी आशिष अनिल गोंदकर यांच्या बंगल्यात 4 ऑगस्ट रोजी दरोडा पडला होता. या दरोड्यात सुमारे सात ते आठ दरोडेखोर सामील होते. त्यापैकी दोघांना अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे. यासीनखाँ उर्फ अनिल शिवाजी भोसले आणि सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले (दोघे. रा. गोंडेगाव, ता. नेवासे जि नगर) अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत.

अटकेतील दोघांनी त्यांच्या सहा साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकला होता. यातील एक अल्पवयीन बालक आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या निर्देशाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांचे सहकारी या दरोड्याच्या तपासात रात्रंदिवस लागले होते. या दरोड्यातील आरोपी सराईत असल्यामुळे ते नेहमी नेहमी राहण्याची जागा बदलत होते. आरोपी गोंडेगाव येथे आले असल्याची माहीती मिळताच दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेत अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here