औरंगाबाद : भिक्षा मागण्यासाठी अज्ञान बालकाची विक्री झाल्याचे धक्कादायक प्रकरण औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिसांनी उघडकीस आणले. त्यानंतर या प्रकरणाची पाळेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव महीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. याबाबत देऊळगाव मही येथून मुकुंदवाडी पोलिसांनी दोघा महिलांना अटक केली आहे.
भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांना अवघ्या शंभर रुपयांच्या बाँडवर खरेदी केल्याचा अमानवीय प्रकार औरंगाबादला उघडकीस आला आहे. सहा वर्षाच्या एका बालकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली आहे. मध्यस्त महिला दलालासह अजून एका महिलेस औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.