बुलढाणा : बुलढाणा येथील एम.ए.ट्रेडर्स यांच्या दुकानासमोर असलेल्या सहाशे लिटर खाद्य तेलाचे तीन बॅरल चोरी झाले होते. सदर घटना 30 जुलै रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तपास लावला असून चौघा जणांना ताब्यात घेतले आहे त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 8 सप्टेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मो.नासीर मो.मन्सूर यांचे एम.ए.ट्रेडर्स या नावाचे किराणा दुकान असून त्यांच्या दुकानासमोरुन सुमारे नव्वद हजार रुपये किमतीचे सहाशे लिटर खाद्य तेलाचे तिन लोखंडी ड्रम चोरुन नेण्यात आले होते. याप्रकरणी बोराखेडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाकल करण्यात आला होता.
पो.नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल जंजाळ व त्यांच्या सहकारी कर्मचा-यांनी तपास लावत मोताळा येथील अफसर शा आणि शे. इम्रान तसेच मलकापूर येथील पारपेठ परिसरातील इरफान शा, शे. रिहान उर्फ रिजवान अशा चौघांना अटक केली आहे. अधिक तपास सुरु आहे.