गुरांचे मांस वाहतुक करणारे वाहन चालकासह ताब्यात

जळगाव : मोठ्या प्रमाणात गुरांचे मांस वाहून नेले जात असल्याची माहिती मिळाल्याने लावलेल्या सापळ्यात एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने वाहनासह मांस व वाहनचालकास ताब्यात घेतले आहे. 3960 किलो वजनाचे मांस 27 प्लॅस्टीकच्या कॅनमधून वाहतुक केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भुसावळ येथून जळगावच्या दिशेने एमएच 46 एआर 0729 या टाटा कंपनीच्या मालवाहू चारचाकी वाहनातून गुरांची अवैध मांस वाहतुक होत असल्याची गोपनीय माहीती पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली होती. त्यानुसार स.पो.नि. अमोल मोरे, पो.उप.निरीक्षक रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. संजीव किरंगे, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. प्रदीप पाटील, पो.ना. सुधीर साबळे, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. इम्रान बेग आदींनी महामार्गावरील कालींका माता मंदीराजवळ सापळा रचला.

सदर वाहन नजरेस पडताच त्याला अडवण्यात आले. वाहनचालक आजम शेख रऊफ (रा. स्वामी नारायण नगर सावदा ता. रावेर जि. जळगाव) याच्या कब्जातील वाहनाची तपासणी केली असता त्यात मांसाने भरलेल्या प्लॅस्टीच्या 27 कॅन आढळून आल्या. सुमारे 5 लाख 94 हजार रुपये किमतीचे मांस व 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकुण 10 लाख 94 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणून जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी संजय शेनफडु धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here