किराना दुकानातील रोकड व दागीने चोरीचा गुन्हा उघडकीस

जळगाव – जळगाव शहराच्या मेहरुण परिसरातील सुनंदा किराणा दुकानातील 2 लाख 49 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली होती. या घरफोडीत 60 हजार रुपये रोख व 1 लाख 89 हजार 800 रुपयांचे सोन्या चांदीचे दागीने असा एकुण 2 लाख 49 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे उघडकीस आले होते.

घटनास्थळाचे निरीक्षण व चोरी करण्याची पद्धत लक्षात घेता सदरची चोरी परिसरातील विशाल मुरलीधर दाभाडे याने केला असल्याचा कयास पोलिसांनी लावला. त्याचा शोध घेत माहीती घेतली असता घटनेच्या रात्री तो त्याचे मित्र योगेश उर्फ पप्ता राजेंद्र चौधरी आणि विकास उर्फ विक्की नारायण खोडके असे तिघे जण सोबत फिरत होते. तिघांचा शोध घेतला असता ते फरार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यांच्यावर संशयाची सुई फिरु लागली.

तिघे जण पहुर येथे असल्याची माहिती पो.नि. शिकारे यांना समजली. त्यानंतर त्यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी आज सकाळी अकरा वाजता त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अटकेतील विशाल दाभाडे याच्यावर यापुर्वी रामानंद नगर व एमआयडीसी पोलिस स्टेशनला सहा गुन्हे दाखल आहेत. 2 सप्टेबर रोजी रामेश्वर कॉलनीतील घरफोडीच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आल्यानंतर लागलीच त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे. सदर गुन्हा चोवीस तासांच्या आत उघडकीस आला असून पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे व सचिन मुंढे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here