जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा उत्साहात

जळगाव – ‘‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझा सर्वोच्च पुरस्कार!’’ मानणाऱ्या श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी जैन हिल्सवर भूमिपुत्र आणि सहकाऱ्यांसह पोळा साजरा करण्याची प्रथा सुरु केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे शासकीय नियम पाळत प्रातिनिधीक स्वरुपात छोटेखानी पोळा अतिशय साध्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भूमिपुत्रांशी बांधिलकी जपणाऱ्या जैन इरिगेशनतर्फे बैलांप्रती कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन व सौ. ज्योती जैन तसेच कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व सौ. शोभना जैन यांनी पोळ्याच्या सोहळ्याच्या वेळी तेथेच मांडलेल्या सप्तधान्यासह बैलजोड्यांचे विधीवत पूजन केले. यावेळी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सौ. ज्योती जैन व सौ. शोभना जैन यांच्या हस्ते पाच सालदार गडींना सपत्नीक भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जैन इरिगेशनच्या कृषी विभागात सुमारे पन्नास सालदार गडी कार्यरत आहेत.

प्रस्तुत प्रातिनिधीक पूजनानंतर जैन हिल्स टॉप, भाऊंची सृष्टी, जैन डिव्हाईन पार्क, जैन व्हॅली व्यूव्ह, जैन लेक व्यूव्ह, टिश्यूकल्चर पार्क, टाकरखेडा अशा विविध स्थळी शेतीनिहाय विभागात स्वतंत्र स्वरुपात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्या-त्या विभाग प्रमुखांच्या हस्ते यावेळी विधिवत पूजन करण्यात आले.

सुमारे पंचवीस बैल जोड्यांना सजवून त्यांची भाऊंच्या समाधी स्थळापर्यंत (श्रद्धाज्योत) साध्या पद्धतीने मिरवणूक यावेळी काढण्यात आली. श्रद्धेय मोठ्या भाऊंना नमन करणारा वृषभराज नम्रतेचे व कृतज्ञतेचं प्रतीक आहे. पोळ्याचे तोरण यावेळी लावण्यात आले. यावेळी जैन रेसिडेन्सी पार्क विभागाचे सालदार गडी भगवान साबळे यांच्या बैलाने यावेळी पोळा फोडला. आरोही जैन, अन्मय जैन, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, अजय काळे, पी. ए. पाटील, रवी कमोद, प्रसाद साखरे व सहकारी आणि शेती विभागातील जैन हिल्स येथे रहिवासी सालदार सहकाऱ्यांच्या परिवारातील सदस्य देखील आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती सुरक्षितता बाळगून व जपून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here