पोलिस भरतीत कमी गुण दिल्याचा आरोप – फौजदाराला मारहाण

सोलापूर – तुमच्यामुळे मी पोलिस दलात भरती झालो नाही. मला कमी मार्क दिले आहेत, असा आरोप करत तरुणाने  फौजदाराला लोखंडी सळईने मारहाणीचा प्रयत्न केल्याच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश घोडके असे या घटनेतील फिर्यादीचे नाव असून कपील बाजीराव खरात असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

विजापूर नाका पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरिक्षक अविनाश घोडके व त्यांचा मित्र दुचाकीने जुळे सोलापूर प्रसादनगर येथे कामानिमीत्त जात होते. त्यावेळी कपिल खरात याने त्यांची दुचाकी अडवली. तुमच्यामुळे मी पोलिस भरती झालो नाही. तुम्ही मला पोलिस भरती परिक्षेत कमी मार्क दिले आहेत असा आरोप करत त्याने लोखंडी सळईने त्यांच्या छातीवर मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अविनाश घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवलादार उपासे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here