जळगाव – उभ्या रिक्षाचे डिक्स व टायर चोरी करणा-या दोघां चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आकाश अरुण जोशी (रा.सिंगापुर कंजरवाडा,जळगाव) व राहुल गणेश महाजन (रा.टिपू सुलतान चौक, तांबापुरा, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. त्यांना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीनुसार आकाश अरुण जोशी याच्या घरात चोरीची डिक्स व टायर असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना किरण मोहन धनगर, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी, पोना भगवान तुकाराम पाटील, पोकॉ. सचिन प्रकाश महाजन, चापोकॉ अशोक पाटील यांनी कंजरवाड्यातील आकाश जोशी याचे घर गाठले.
त्यावेळी घरात हजर असलेल्या आकाश समक्ष घरझडती घेतली असता दोन डिक्ससह टायर मिळून आले. दोन्ही डिक्ससह असलेले टायर त्याने त्याचा साथीदार राहुल गणेश महाजन याच्या मदतीने जोशी कॉलनीत उभ्या असलेल्या दोन रिक्षाचे काढून चोरी केल्याचे त्याने कबुल केले. या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल होता. तो गुन्हा उघडकीस आला आहे. आकाश जोशी याच्यासह त्याचा साथीदार राहुल महाजन या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना मुद्देमालासह पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.