हद्दपार आरोपी एलसीबीच्या ताब्यात

जळगाव – जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला व रेकॉर्डवरील आरोपी समाधान हरचंद भोई ( रा. खंडेरावनगर जळगाव) हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घरी आढळून आला. त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील विजय शामराव पाटील, पो.ना. अविनाश देवरे, पो.कॉ. पंकज शिंदे यांच्या आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

अटकेतील आरोपी समाधान भोई याने हद्द्पारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध मुंबई पोलिस कायदा कलम 142 नुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here