जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गुरे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकडे आपला मोर्चा वळवला असून एका आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. गुरे चोरी केल्याचा गुन्हा त्याने कबुल केला आहे. अमजद शेख फकीरा ( रा. सुप्रिम कॉलनी जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अमजद शेख फकीरा याने अमळनेर तालुक्यातील मारवड आणी धुळे जिल्ह्यातील नरडाणा येथून गुरे चोरल्याची कबुली दिली असून गुरे चोरीची एकुण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. मारवड येथील तिन व नरडाणा येथील एक असे चार गुन्हे अमजद याने केले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार अनिल जाधव, विजय पाटील, हे.कॉ.अश्रफ शेख, संदिप सावळे, दिपक शिंदे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.