जळगाव – गणेशोत्सव कालावधीत सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासह कोविड नियमावली व उपाययोजनांबाबत पोलिस दलाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या आसोदा, ममुराबाद, कानळदा व आव्हाणे या गावांमधे तालुका पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस अधिकारी व अंमलदाराचा आज रुट मार्च घेण्यात आला.
याशिवाय हद्दीतील उपद्रवी इसम असलेल्या लिलाधर सपकाळे (कानळदा ता.जळगाव), सुक्राम कोळी (नांद्रा ता. जळगाव), संदीप कोळी (आसोदा ता.जळगाव), सोपान सपकाळे (आव्हाणे ता. जळगाव), ओंकार कोळी (आव्हाणे ता. जळगाव), इश्वर सोनवणे (सावखेडा ता. जळगाव) यांना गणेशोत्सव कालावधीत हद्दीत प्रवेश बंदीचे आदेश बजावण्यात आले . याशिवाय 15 जणांवर मुंबई प्रोव्हिबीशन कलम 93 नुसार व 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
काढण्यात आलेल्या रुट मार्चमधे पो.नि. रामकृष्ण कुंभार, पो.उ.नि. नयन पाटील, कल्याण कासार, सहायक फौजदार नितीन पाटील, हे.कॉ. हरिलाल पाटील, वासुदेव मराठे, गजानन पाटील, अनिल तायडे, अनिल फेगडे, इश्वर लोखंडे, साहेबराव पाटील, पोलिस नाईक सुशील पाटील, विश्वनाथ गायकवाड, बापू कोळी, प्रशांत पाटील, संदीप पाटील, नरेंद्र पाटील, दिपक कोळी आदींनी सहभाग घेतला.