मोटार सायकल चोरटा अटक

जळगाव : जिवन गोकुळ शिंदे या मोटार सायकल चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. जळगाव शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून 18 जुलै 2020 रोजी मोटार सायकल चोरी केल्याचे त्याने कबुल केले आहे.

हरिष गिरधर भोळे रा. आसोदा – जळगाव यांची मोटारसायकल जुलै 2021 मधे शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून चोरी झाली होती. त्याबाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा केल्यापासून आरोपी जिवन शिंदे फरार होता. एक वर्षानंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पुरुषोत्तम वागले, पो ना सचिन देशमुख यांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here