जळगाव – गावठी कट्टा बाळगणा-या तरुणासह त्याच्या साथीदाराला चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. दिपक गणेश एरंडे (23) रा. खरजई ता. चाळीसगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला खरजई गावातून अटक करण्यात आली आहे.
दिपक एरंडे याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस असा एकुण 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार अशा दोघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम 3,7/25 म.पो.का 37(1)(3) चे कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.नि. के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिपक बिरारी, पो.ना. दिपक पाटील, तुकाराम चव्हाण, पो.कॉ. निलेश पाटील, अशोक मोरे, गणेश कुंवर, शरद पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. दिपक बिरारी करत आहेत.