जळगाव – राकेश उर्फ लिंबु राक्या चंद्रकांत साळुंखे (कांचन नगर जळगाव) या तरुणाल शनीपेठ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. गावठी पिस्टल कब्जात बाळगून राकेश साळूंखे दहशत माजवत असल्याची माहिती पो.नि. बळीराम हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे.
वाल्मिक नगर परिसरातून त्याला अटक करण्यात आलि असून त्याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार परिष जाधव, राहुल पाटील, प्रमोद पाटील व शरद पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अधिक तपास परिष जाधव करत आहेत.
प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याची हत्या